खानापूर : गेल्या काही वर्षापासून पुणे या ठिकाणी कामानिमित्त स्थायीक असलेल्या चापगाव ता. खानापूर येथील बळीराम यल्लाप्पा कदम यांचा शनिवारी रात्री कात्रज बोगद्याजवळ दुचाकीला अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी तातडीने पुणे सिल्वर बर्थ हॉस्पिटल नऱ्हे या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर उपचार झाला नसल्याने रविवारी सायंकाळी 6 वाजता त्याचे निधन झाले. बळीराम कदम हा पुणे शिवापूर येथे काम करत होता. तो गणेश चतुर्थीला चापगाव गावी आला होता. दुसऱ्याच दिवशी तो पुण्याला परत गेला होता. बळीराम कदम हा चापगाव येथील गवंडी मेस्त्री यल्लाप्पा भरमाना कदम यांचा चिरंजीव होय. त्याच्यावर अंतिम संस्कार आज सोमवार दि. 8 रोजी दुपारी 12 वा. चापगाव येथे होणार आहे. त्याच्या पश्चात आई, वडील भाऊ, बहिण असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta