गर्लगुंजी : श्री ओमकार मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघ नियमित गर्लगुंजी या सहकारी पतसंस्थेची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पाडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. अनंत ज्योतिबा मेलगे आणि उपाध्यक्ष स्थानी श्री. नामदेव परशराम धामणेकर त्यांनी विराजमान होते. दिनांक 31 मार्च 2025 अखेरीस संस्थेकडे एकूण सभासद 570 आहेत. संस्थेकडे एकूण खेळते भाग भांडवल 9 कोटी 21 लाख 51 हजार 356 रुपये इतके आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल 23 कोटी 16 लाख 27 हजार 275 रुपये इतकी झाली आहे. संस्थेने एकूण पाच कोटी 98 लाख 63 हजार 130 रुपये कर्ज वाटप केले आहे. अहवाल साली संस्थेला एकूण तीन लाख 32 हजार 240 रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मऱ्याप्पा पाखरे यांनी केले. अहवाल वाचन संस्थेचे सेक्रेटरी श्री. सातेरी गोरे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. रेखा यरमाळकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत सौ. माधुरी शिवाप्पाचे यांनी केले. व्यासपीठावर नंदकुमार पाटील, यल्लाप्पा पाटील, शिवाजी पाखरे, लुमाना गोरे, संजय मोरे, संजय कोलकार, रुक्मिणी धामणेकर, लक्ष्मी पाखरे, संस्थेचे सल्लागार, सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि ज्येष्ठ सभासद आदर्श शिक्षक सर नामदेव कुंभार, पी डी कुंभार सर, सुदेश मेलगे सर, सौ. किरण धामणेकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta