खानापूर : काल रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर लावलेल्या दोन दुचाकी एक होंडा व दुसरी सुझुकी अशा दोन दुचाकी जळून खाक झाल्या असून अज्ञात व्यक्तींनी हे दुष्कृत्य केले आहे.
सद्दाम अस्लम सय्यद यांच्या या दोन दुचाकी होत्या. समजा घराने पेट घेतला असता तर मात्र अजून जास्त अनर्थ घडला असता. परंतु नशीब बलवत्तर म्हणून घरास आग लागली नाही आणि पुढचा अनर्थ टळला.
आज हंदूर येथे जाऊन जळालेल्या दुचाकी व घराचा पुढचा भाग थोडा जळालेला आहे त्याची पहाणी केली. व लगेच नंदगड सीपीआय यांना सदर घटनेची माहीती सुरेशभाऊ जाधव यांनी फोनवर कळविली व ताबडतोब तपास करून असे दुष्कृत्य करणारावर ताबडतोब कारवाई करावी असे सीपीआय साहेबांना सांगितले आहे.
नंदगड पोलिसांनी ताबडतोब तपास करून गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेसने नंदगड पोलींसाकडे केली आहे.
यावेळी बसेट्टी सावकार, सुरेश भाऊ जाधव, देमान्ना बसरीकट्टी, दिपक कवठनकर तसेच हंदूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta