आगारप्रमुख, ड्रायव्हर, कंडक्टरना गर्लगूंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी धरले धारेवर!
खानापूर : बस आगार प्रमुख आणि त्यांच्या सहकारी यांच्या दुर्लक्ष्यामुळे काही बसेसच मेंटेनेन्स, रिपेअर वेळेत न झाल्यामुळे बसेसचे कंट्रोल बोर्ड, ब्रेक्स, स्टेक्स, छत असे भाग निकामी झालेले दिसून येतात त्यामुळे बसेस मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचे प्रकार घडत आहेत. अशाच घडलेल्या एका प्रकारामुळे तालुक्यातील एका शेतकऱ्याला बस बाजूने घासून गेली, त्याच बरोबर म्हशींना ही लागले, काही विद्यार्थी बाजूला पडल्याची घटनाही घडली. पण प्रसाद पाटील यांनी याची विचारणा केल्यावर बस ड्रायव्हरनी बस मधील रिपेअर आणि मेंटेनन्सच जणू प्रात्यक्षिक दाखवलं त्यामुळे प्रसाद पाटील यांनी सरळ बस अगार प्रमुखांना भेट घेऊन तंबी दिली, कोणत्याच प्रकारे विद्यार्थी आणि नागरिक, बस प्रवाशी यांचे जीव धोक्यात घालू नका, बसेसचे मेंटेनन्स आणि दुरुस्ती व्यवस्थित वेळेत करा आणि सुरक्षित बसेसच वापरात घ्याव्यात, अशी विनंती केली. यावेळी नगरसेवक तोहिद चांदखनवर, खानापूर तालुका वहातूक संघटना अध्यक्ष प्रमोद सुतार हेही उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta