खानापूर : तालुक्यातील मौजे शिवठाण येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित रवळनाथ हायस्कूलला इनर व्हील क्लब, खानापूरतर्फे विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी स्वच्छ पाण्याची टाकी भेट देण्यात आली.
कार्यक्रमास क्लबच्या अध्यक्षा सौ. वर्षा सुरेश देसाई, सेक्रेटरी सौ. सविता कल्याणी, एडिटर सौ. साधना पाटील, आयएसओ सौ. प्रियांका हुबळीकर, मेंबर सौ. गंधाली देशपांडे, माजी ट्रेझरर सौ. अश्विनी पवार व सौ. रूपा कुलकर्णी उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापक पी. ए. पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
आपल्या मनोगतात अध्यक्षा सौ. वर्षा देसाई म्हणाल्या, “दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन सामाजिक जाणीवेतून क्लबमार्फत ही टाकी दिली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शैक्षणिक प्रगती साधावी.”
शाळेच्या वतीने क्लबच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सौ. सविता काजूनेकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Belgaum Varta Belgaum Varta