

खानापूर : दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळ शाहूनगर खानापूर येथील देवीच्या दर्शनास माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर या उपस्थित राहून आशीर्वाद घेतले.
आज साधारण ११.३० च्या सुमारास अंजलीताई निंबाळकर शाहूनगर येथे देवीच्या नवरात्र उत्सवास पोचल्या. आजचा शेवट दिवस असल्यामुळे ताईंच्या हस्ते आरती झाली. शाहुनगरवाशाीयांनी ताईंचे शाल व हार घालून स्वागत केले. ताईंनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या व मी कायम शाहुनगरवाशीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे काळजी करू नका, असे आश्वासन दिले.

यावेळी शाहूनगर मधील नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते राजू कुडाळे, राजू सोनटक्के, आकाश सारे, विष्णू सोनटक्के, किशोर कुडाळे, रोहीत कुडाळे, राम सोनटक्के, यांच्यासह कार्यकर्ते तसेच महिला मंडळ, युवक वगैरे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta