

खानापूर : कारलगा हट्टी (तालुका खानापूर) येथील ग्रामदैवत श्री ब्रह्मदेव मंदिराच्या जीर्णोद्धारास सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये मंदिराच्या जीर्णोद्धारा संदर्भात चर्चा करून एकमताने मंदिर जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला व सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी ग्रामदैवत चव्हाटा व ब्रह्मदेव मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालून मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ करण्याचे ठरविण्यात आले. गेले कित्येक वर्ष हे काम स्थगित होते परंतु गावकऱ्यांच्या सर्वांमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामदैवत मंदिरांचे चिरलोोदार करण्याचे ठरविण्यात आले आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री ब्रह्मदेव हे स्वयंभू जागृत ग्रामदैवत आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये होणाऱ्या ग्रामदेवता लक्ष्मी यात्रेच्या आधी हे मंदिर पूर्ण व्हावे अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. मंदिराचा सुनियोजित नकाशा देखील तयार झाला आहे. सदर मंदिराचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून होणार असून इच्छुक देणगीदारांनी सढळहस्ते मंदिराला मदत करावी अशी विनंती देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. देणगीदारांनी देवस्थान कमिटीशी संपर्क साधून भरघोस देणगी देऊन मंदिर जीर्णोद्धारास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta