

खानापूर : लोकशाही आणि डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे. आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. ह्या घटनेचा मी तीव्र निषेध करते व कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत, ह्यासाठी आपण सर्वानी मिळून कायम प्रयत्नशील राहूयात, असे आवाहन माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केले.
सध्या काही विषवल्ली संविधानास सुद्धा मानत नाहीत. त्यामु़ळे आपला देश कुठे चालला आहे याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. असे सांगत देशाच्या सरन्यायाधीशांवरील झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
Belgaum Varta Belgaum Varta