
खानापूर : कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट लीग केएसपीएल-२ स्पर्धेत ‘राजा शिवाजी’ हा संघ बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, ती आयपीएलच्या धर्तीवर आयोजित केली जाणार आहे.
माजी आमदार व कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट असोसिएशनच्या (एआयसीसी) सचिव डॉ. अंजली निंबाळकर या राजा शिवाजी संघाच्या मुख्य प्रायोजक आहेत.
स्पर्धेत १० षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलप्रमाणेच मनोरंजन आणि थेट प्रक्षेपण असल्यामुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा पहिल्याच हंगामात खूप लोकप्रिय झाली होती. राजा शिवाजी संघाने पहिल्या हंगामात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
स्थानिक खेळाडूंना संधी : या संघात जिल्ह्यातील अनेक स्थानिक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. खानापूरचे किरण पाटील हे संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक आहेत.
संघातील खेळाडू : प्रशांत निळकंठाचे, अभिजीत कुट्रे, प्रसाद नाकाडी, गणेश किरकसाली, किरण तरळेकर, अनिकेत लोहार, संतोष सुळगे – पाटील, शफिक गोरलकोप, नरेंद्र मांगुरे, अभिषेक देसाई, चंदन तळवार, रब्बानी दफेदार, राहुल कुडचे, श्रेयस मातीवड्डर, संतोष महाजन, प्रवीण कळ्ळे आणि आकाश असलकर यांचा संघात समावेश आहे.
स्पर्धेची वेळ आणि ठिकाण : सॉफ्टबॉल क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक राज्य सॉफ्ट बॉल क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित ही स्पर्धा १ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत बंगळूरमधील चिक्कनहळळी मैदानावर खेळविली जाईल.
Belgaum Varta Belgaum Varta