

खानापूर : रविवार दिनांक २६/१०/२०२५ रोजी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक श्री राजा शिव छत्रपती स्मारक येथे म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी १ नोव्हेंबर काळादिन सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन करून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सीमाप्रश्न सोडविण्याच्या दिरंगाईबाबत निषेध व्यक्त करून काळा दिवस गांभीर्याने पाळण्याचे ठरविण्यात आले आहे.
यावेळी या संदर्भात समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, श्री. विलासराव बेळगावकर, श्री. निरंजन सरदेसाई, श्री. मारुतीराव परमेकर, श्री. मुरलीधर पाटील, श्री वसंत नावलकर, श्री रुक्माणा झुंजवाडकर, श्री. गोपाळराव पाटील, श्री. राजाराम देसाई, श्री. रमेश धबाले, श्री. शामराव पाटील, श्री. रणजित पाटील यांनी विचार व्यक्त केले.
येता काळा दिवस तालुक्यातील मराठी सीमावासियांनी गांभीर्याने पाळावा असे आवाहन करण्यात आले. यासाठी खानापूर शहरात बाजारपेठेत पत्रके वाटण्यात आली. यानंतर मंगळवारी जांबोटी बाजारपेठ, बुधवारी नंदगड बाजारपेठ, शुक्रवारी कणकुंबी बाजारपेठ येथे काळादिन संदर्भात पत्रके वाटून जनजागृती करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर सीमा प्रश्नी तज्ञ कमिटीमध्ये खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून समितीने ते प्रकाश चव्हाण त्यांचे नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आले आहे भविष्यात सीमा प्रश्न लवकरात लवकर निकालात लागावा यासाठी मध्यवर्तीच्या ध्येयधोरणांशी बांधील राहून प्रकाश चव्हाण यांनी तज्ञ समितीवर कार्यरत राहावे अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे समिती कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता तो पुन्हा एकदा फेटाळण्यात आला सदर बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस श्री आबासाहेब नारायणराव दळवी यांनी केले.
यावेळी श्री. जयराम देसाई, श्री. रमेश धबाले, श्री. मारुती गुरव, श्री. कृष्णा मन्नोळकर, श्री. कृष्णा कुंभार, श्री. म्हात्रू धबाले, श्री. ब्रह्मानंद पाटील, श्री. अजित पाटील, श्री. बी बी पाटील, श्री. रामचंद्र गावकर, श्री. अमृत पाटील, श्री. प्रकाश चव्हाण, श्री. अमृत शेलार, श्री. मोहन गुरव, श्री. नाना घाडी, श्री. संदेश कोडचवाडकर, श्री. देवाप्पा भोसले, श्री. पुंडलिक पाटील, श्री. मरू पाटील, श्री. नागोजी पावले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta