
खानापूर : हेस्कॉमकडून वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
खानापूर वीज केंद्रात अचानक दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्यामुळे खानापूर शहरासह लैला शुगर्स, देवलत्ती, बिदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, भंडरगाळी निडगल, दोड्डहोसुर, सन्नहोसूर, करंबळ, जळगा, कुप्पटगिरी, लोकोळी, लक्केबैल, येडोगा, बलोगा, जैनकोप्प, गांधीनगर, हलकर्णी, न्यायालय परिसर, औद्योगिक वसाहत, बाचोळी, कौंदल, झाड नावगा, लालवाडी, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, कारलगा, शिरोली, चापगाव, लोंढा, नागरगाळी, कुंभार्डा, तारवाड, गुंजी, मोहिशेत, भालके बी.के., भालके के.एच., शिंदोळी, होणकल, सावरगाळी, आंबेवाडी, तिवोली, डिगेगाळी, शिवाजीनगर, रुमेवाडी, ओतोली, मोदेकोप्प, नागुर्डा, रामगुरुवाडी, हरसनवाडी, असोगा, नेरसा, अशोक नगर, हेमाडगा आणि मणतुर्गा या गावांचा वीजपुरवठा बंद राहील.
हेस्कॉमकडून ग्राहकांना विनंती करण्यात आली आहे की, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी सहकार्य करावे. कार्य पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही हेस्कॉमकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta