खानापूर (वार्ता) : बेळगाव-पणजी महामार्गावरील खानापूरातील आंबेडकर गार्डन जवळ मोकट जनावरे सायंकाळी जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने जनावराचे तोंड फुटून गेले. मात्र अज्ञात वाहनाने पलायन केले. ही माहिती मिळताच खानापूरातील सामाजिक कार्यकर्ते व पशुमित्र प्रज्योत दलाल, दिपक सुतार, निलेश सडेकर, अवधूत परब, सुरज कदम, श्री पाटील, संदिप चौगुले आदींनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन पशुवैद्यकीय डॉ. मष्णू कदम यांना बोलावून जखमी जनावरावर प्राथमिक उपचार केले.
जखमी जनावराचे तोंड फुटून गेले होते. त्याच्या डोळ्यालाही जखम झाली होती. ते जनावर रक्त बंबाळ झाले होते. अशा परिस्थितीत त्या जखमी जनावराला वाहनातून सन्नहोसुर येथील श्री महालक्ष्मी गो शाळेत दाखल करण्यात आले.
यावेळी संस्थापक भरमानी पाटील यांनी त्या जखमी जनावराचा स्विकार करून त्याच्यावर उपचाराची व्यवस्था केली आहे.
