खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावच्या ग्राम दैवत श्री महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करून नूतन इमारत उभारण्यात आली आहे.
इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मंदिराच्या इमारतीचे रंगकामही प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर सोमवारी दि. 31 जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी मंदिराच्या नूतन इमारतीच्या स्लॅबकौलाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्लॅबकौलाचा शुभारंभ प्रसंगी विधिवत पुजा करण्यात आली.
यावेळी शेतकरी सोसायटीचे चेअरमन सुभाष पाटील, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुरेश मेलगे, सदस्य हणमंत मेलगे, संस्थापक जयसिंग पाटील, मंदिर कमिटीचे सचिव जे. बी. पाटील, मनोहर चौगुले, गंगाराम सांबरेकर, शिवाजी गावडे, दत्तात्रय पाटील, निगाप्पा मेलगे, चन्नापा मेलगे, शिवाजी हुंदरे तसेच तरूण युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गावचे सुपूत्र व कोल्हापूरचे बिल्डिंग कॉन्ट्रक्टर तुकाराम नंद्याळकर ग्रुपच्या नेतृत्वाखाली बांदेकर वाडा येथील कलाकारानी मंदिराच्या नूतन इमारतीच्या स्लॅबवर कौले बसविली. त्यामुळे गर्लगुंजी गावातून समाधान पसरले आहे.
Check Also
खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या …