
खानापूर : आज पहाटे ४.३० वाजता बीईओ ऑफीसमध्ये सुरू असलेले इटगी विद्यार्थ्यांचे आंदोलन तात्पुरते कायदेशीर बाबींमुळे स्थगित करण्यात आले आहे.
शेवटी आज पहाटे ४.३० वाजता पालक व सरकारी अधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा होऊन इटगी विद्यार्थ्य्यांचे आंदोलन तात्पुरते २-३ दिवसांसाठी स्थगित केले आहे.
डीडीपीआय यांनी पहाटे ४ वाजता व्हीडीओ द्वारे पालकांना विनंती केली मग खानापूर ब्लॉक काँग्रेसने सुद्धा लहान मुलांना जास्त त्रास होता कामा नये म्हणून समंजसपणाची भूमिका घेतली… तशी ती सर्वांनीच घेतली, नंदगड व खानापूर पोलीस प्रशासनाने सुद्धा सहकार्य केले.
संस्था चालकांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून विद्यार्थ्यांची अडवणूक न करता ज्यांना जिथे शिकायचे असेल तिथे शिकू द्यावे अडमूठी भूमिका घेऊ नये. आज ना उद्या मा. न्यायालय स्थगिती मागे घेतलेच, कारण मुलांना आपले स्वतःच्या दाखल्यासाठी कोणीही अडवणूक करू शकत नाही हेच अंतिम सत्य न्यायालयात पण टिकेल. परंतु संस्था चालकांनी व त्यांच्यावर राजकीय वरदहस्त ठेवणाऱ्यांनी ज्या ४० मुलांची आडवणूक चालवली आहे ती अत्यंत चुकीची आहे. द्वेषमूलक आहे हे मात्र नक्की.
खानापूर ब्लॉक काँग्रेसनेही सांगितले की, तालुक्यातील कोणत्याही शिक्षण संस्था चालकांच्या विरोधात नसून आम्ही फक्त ४२ विद्यार्थ्यांचे कोणतेही शालेय नुकसान होऊ नये त्यांना जिथे शिक्षण घ्यायचे असेल तिथे घेऊ द्यावे या मताचे आहोत. त्यासाठी आम्ही आंदोलनकर्त्या मुलांच्या व पालकांच्या सोबत शेवटपर्यंत राहूयात कोणीही शंका बाळगण्याचे कारण नाही.
आज जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) व विद्यार्थी / पालकांचे याचिकाकर्ते धारवाड हायकोर्ट येथे जाऊन सरकारी अभिव्यक्तांशी भेटून मुलांचे नुकसान कसे टाळता येईल यासंदर्भात चर्चा करून येणार आहेत व सरकारी अभिवक्ता जो सल्ला देतील त्याप्रमाणे पुढील वाटचाल केली जाईल…
खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर सुद्धा या सर्व घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. लवकरच ताई सन्माननीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री यांचेशी संपर्क साधून मुलांचे नुकसान कसे टाळता येईल आणि दाखले कसे लवकरात लवकर मिळतील यासंदर्भात चर्चा करणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta