
खानापूर : खानापूर तालुक्यातील सुळेगाली गावात विद्युतभारित विजेच्या तारांचा शॉक लागून दोन हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे वनविभाग आणि वीज वितरण संस्थेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाले असून कर्नाटक राज्याचे वनमंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी याप्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सूचना वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी दिली आहे.
हत्तींचा झालेला दुर्दैवी मृत्यू ही खूप गंभीर बाब आहे वन्य जीवाची हानी झाली असून या घटनेमुळे पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta