
खानापूर : तालुका पंचायत सभागृहात बुधवारी तालुका पंचहमी योजना अंमलबजावणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध हमी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
हेस्कॉमचे लेखा अधिकारी बी. ए. धरमदास यांनी सांगितले की, तालुक्यात गृहज्योती योजनेचे ६१,९९४ लाभार्थी असून, ऑक्टोबर महिन्यात १ कोटी ९९ लाख ५० हजार रुपयांचे वीज बिल माफ करण्यात आले आहे.
महिला व बालकल्याण विभागाचे असिस्टंट सीडीपीओ विक्रम के. बी. आणि एफडीए दीपक एम. पवार यांनी सांगितले की, गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत ६४,१२० महिलांना प्रत्येकी २,००० रुपये अनुदान मिळत असून, दर महिन्याला १ कोटी २८ लाख २४ हजार रुपये इतकी रक्कम जमा होत आहे.
शक्ती योजना आगारप्रमुख संतोष बेनकनकोप यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात ७,९०,१७९ महिला प्रवाशांनी मोफत प्रवास केला असून, त्याची किंमत २ कोटी २४ लाख २३ हजार ८ रुपये आहे.
युवा निधी योजनेंतर्गत तालुक्यात ९,१२९ लाभार्थी असून, निधी तीन महिन्यांतून एकदा जमा केला जातो. जुलैपर्यंतचा निधी जमा झाल्याची माहिती अधिकारी संपत कुमार यांनी दिली.
फूड इन्स्पेक्टर संतोष यमकनमर्डी यांनी सांगितले की, राशनचे वितरण व्यवस्थित चालू आहे. अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी बीपीएल कार्ड रद्दबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून आलेल्या यादीप्रमाणे बीपीएल कार्ड रद्द केली जात आहेत.
या प्रसंगी खानापूर तालुका ऊस्तवारी रुद्रया हिरेमठ (गॅरंटी योजना बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष) यांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीस प्रकाश मादर, बाबू हत्तरवाड, प्रियांका गावकर, रुद्रप्पा पाटील, शांताराम गुरव, राजा कुडाळे, इसाखान पठाण, संजय गावडे, गोविंद पाटील, तसेच तालुका पंचायत अधिकारी रमेश मैत्री उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta