
खानापूर : खानापूर तालुक्यात प्रशासकीय बदल घडत असून, तालुक्याचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांची बदली करण्यात आली आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हे बदल आदेश जारी केले असून त्यांच्या जागी श्रीमती मंजुळा के. नायक यांची खानापूरच्या नवीन तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही कारवाई एका शेतीसंबंधी प्रकरणातून उद्भवली आहे. संबंधित प्रकरणात उच्च न्यायालयाने सर्वे करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते, मात्र तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी ते आदेश बजावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यानंतर, कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने सात दिवसांच्या आत त्यांच्या बदलीचे आदेश देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते.
न्यायालयाच्या सूचनेनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तात्काळ कारवाई करत कोमार यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यांच्या जागी अनुभवी अधिकारी श्रीमती मंजुळा के. नायक यांची खानापूर तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta