
खानापूर : समर्थ इंग्लिश मीडियम हायस्कूलने जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत यश मिळवत ऐतिहासिक झेप घेतली व तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी राज्य पातळीवर पाठवण्याचा विक्रम बनविला. तब्बल 22 विद्यार्थी जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत 14 वर्षीय वयोगटातून मुलींच्या संघाने 10-2 अशी बाजी मारत राज्यात पहिला येण्याचा मान मिळविला. तसेच 14 वर्षीय वयोगटातून 17 वयोगटातून मुले व मुली यांच्या संघाने द्वितीय येत प्रत्येकी पाच विद्यार्थी राज्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रथम क्रमांकातून 7 तर द्वितीय क्रमांकातून पाच-पाच विद्यार्थी राज्यासाठी निवडण्यात आले. अशारितीने एकूण 22 विद्यार्थी बेंगळुरू येथे होणाऱ्या नेटबॉल स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांना निपुण बनविण्यासाठी शाळेचे शारीरिक शिक्षक अथक परिश्रम घेत आहेत. या यशाबद्दल शाळेचे सचिव डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी बाळकृष्ण हलगेकर सरांचे कौतुक केले व इतर संस्थापकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या ऍडमिन दिव्या नाडगौडा, मुख्याध्यापक बाळकृष्ण हलगेकर व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेतले. चेअरमन एफ. एम. पाटील, डॉ. हेरवाडकर, डॉ. पी. एन. पाटील, डॉ. कदम यांनीही मुलांना शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta