
खानापूर : बालदिनाचे औचित्य साधत गर्लगुंजी गावातील होतकरू खेळाडूंना खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने एकलव्य क्रीडा केंद्र गर्लगुंजी यांच्या पुढाकाराने गावातील ज्येष्ठ व्यक्ती आणि पालकांच्या उपस्थितीत 50 स्पोर्ट्स जर्सी आणि स्पोर्ट्स किट बॅग बॉटल वितरण करण्यात आल्या. गाव व्यसनमुक्त व्हाव, खेळांची आवड निर्माण व्हावी, खेळातून करिअर घडावे, हाच मुख्य उद्देश असल्याचे ग्राम पंचायत सदस्य आणि स्पोर्ट्स किटचे मुख्य प्रायोजक प्रसाद विट्ठलराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

त्याचबरोबर इतर प्रायोजक बाबुराव मेलगे, परशराम गोरे, संतोष मेलगे हेदेखील यावेळी उपस्थित होते. प्रमुख वक्ते माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांनी खेळाचे महत्व पटवून देत मुलांना मार्गदर्शन केले. एकलव्य क्रीडा केंद्र दरवर्षी जिल्हा पातळीवरच्या खो खो स्पर्धा आयोजित करतात. त्यामुळे खेळाडूंना वाव मिळाला आणि गावातील 48 तरुण भुसेना, वायुसेना आणि नौदलात निवडली गेली. त्याचबरोबर गावातील न्यू मराठा स्पोर्ट्स क्लबयांच्या वतीने उत्तम असे क्रिकेट आणि कब्बडी स्पर्धांचे आयोजन केले जाते, त्यामुळे खेळाडूंना वाव मिळत आहे.
यावेळी अध्यक्षस्थानी गोपाळ पाटील होते. प्रमुख वक्ते पांडुरंग सावंत, द्वीपप्रज्वलन ग्रा. पं. सदस्य हणमंत मेलगे, प्रसाद पाटील, पिकेपिएस चेअरमन संजय पाटील, एसडीएमसी अध्यक्ष गोकुळ चौगुले, संतोष पाटील, एसडीएमसी सदस्य संभाजी मेलगे यांच्या हस्ते झाले.
प्रसंगी मऱ्यापा पाखरे, मोहन भातकांडे, माजी सैनिक बाबुराव मेलगे, एकलव्य क्रीडा केंद्राचे प्रशांत पाखरे, सुमित मेलगे, साईराज गोरे, योगेश मेलगे, स्वप्नील पाटील, अमोल खटोरे, सुरज गोरे, नागराज गोरे, वेदांत मेलगे, श्रीधर मलिक, जकनू गोरे, ओंकार चौगुले, दीपक चौगुले, पुंडलिक पाटील त्याचबरोबर राज्य स्तरीय खेळाडू वैभव गोरे आणि मारुती पाटील, ज्युडो राष्ट्रीय खेळाडू रोहिणी पाटील आणि सर्व विद्यार्थी पालक वर्ग तसेच गावकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिग्विजय मेलगे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta