
खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे विद्यालय नेहमीच सर्वांगीण विकासाबरोबर विद्यार्थिनींचा स्पर्धात्मक दृष्टिकोन जोपासणारे विद्यालय म्हणून समस्त खानापूर व बेळगाव जिल्ह्याच्या परिचयाचे आहे. मौजे मुगळीहाळ सरकारी कॉलेज मध्ये खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सांस्कृतिक स्पर्धा सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 संपन्न झाल्या. या अंतर्गत इंग्रजी निबंध स्पर्धेत सर्व महाविद्यालयातील प्रतिभावंत स्पर्धकांनी भाग घेतला होता..
ताराराणी काॅलेजची वाणिज्य शाखेची पी यु सी प्रथम वर्षात शिकणारी विद्यार्थीनी कुमारी स्वाती सुनील पाटील हिचा निबंध लेखनाला प्रथम क्रमांक मिळाला.
तिने “संगणक युगालील शिक्षकाची भुमिका!” या आव्हानात्मक विषयावर आपल्या निबंधाची मांडणी केली. मुद्देसूद मांडणी, लिखाणातील स्वच्छता, संदर्भांची सांगड,निरिक्षणातील बारकावे व विश्लेषक दृष्टीकोन या निकषावर लिहिलेला निबंध प्रशिक्षकाच्या अभ्यासू चाचणीत अव्वल ठरला आहे.
कुमारी स्वाती पाटील हिने मिळविलेले हे इतर विद्यार्थ्यांनीना प्रेरणादायी ठरले असून काॅलेजच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने खानापूर तालुक्यातील प्रथम व द्वितीय वर्षात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दिलेली मात कौतुकास्पद असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संचालक श्री. शिवाजीराव पाटील, ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव, प्रा. एन ए. पाटील यांच्या उपस्थितीत कुमारी स्वाती पाटील हिचे काॅलेजच्या सर्व प्राध्यापक वर्गाने अभिनंदन केले तसेच आता ताराराणी काॅलेजचे प्राचार्य अरविंद पाटील व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. टी आर जाधव यांच्या प्रोत्साहनाखाली कु. स्वाती आता जिल्हास्तरीय स्पर्धेची तयारी करीत आहे.
मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यादव यांनी कुमारी स्वाती पाटील हिचे विशेष अभिनंदन केले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta