
कारलगा हायस्कूल कारलगा येथे फिरते विज्ञान प्रयोगालय
खानापूर : विज्ञान प्रयोगातूनच सिद्ध होते. सृष्टीतील रहस्य उकलून मानवाच्या प्रगतीचा मार्ग दाखवण्याचे महत्त्वाचे कार्य विज्ञान करते. त्यांनी विज्ञानाचे विविध उपयोग स्पष्ट करत विज्ञान मानवी जीवनाचा उत्क्रांतीत कसा सकारात्मक बदल घडवतो, असे प्रतिपादन कायदे सल्लागार अभिजीत उदयसिंग सरदेसाई यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे आयोजन गोवा विज्ञान केंद्र पंजी जिल्हा विज्ञान केंद्र गुलबर्गा ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक संशोधन केंद्र पुणे आणि कारलगा हायस्कूल कारलगा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावातील निवृत्ती शिक्षक वामन लक्ष्मण पाटील हे होते.
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे गोवा विज्ञान केंद्राचे भूषण राऊत, गुलबर्गा जिल्हा विज्ञान केंद्राचे लक्ष्मीकांत जमादार, अंबराया बेलमगी आणि आयुष देशमुख श्रीयश पवार अजित जेरे हे सुद्धा उपस्थित होते.
गावातील नागरिक मनोहर ना. पाटील, अरुण नलावडे, रणजित पाटील, गणपती पाटील, परशराम घाडी, रवी सुतार, संजय अंकुश गणाचारी, गोविंद कुटरे, तुकाराम घाडी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रस्ताविक मुख्याध्यापक ए एम पाटील, सूत्रसंचालन श्रीमती ए एम लोहार, आभार शेखर पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta