
बेळगाव : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालय नेहमीच अभ्यास, कला व क्रीडा क्षेत्रांमध्ये बेळगाव जिल्ह्यात अग्रगण्य कॉलेज राहिले आहे.
अभ्यासात अव्वल स्थानी असणाऱ्या येथील विद्यार्थिनी क्रीडाक्षेत्रातही उत्तम नावलौकिक मिळवित आहेत. खानापूर तालुक्याच्या नेतृत्व करणाऱ्या या महाविद्यालयाच्या खो- खो पथकातील खेळाडू कु. नीलम कक्केरकर (कर्णधार), कु. लक्ष्मी हंगिरकर, कु. अपेक्षा निलजकर, कु. साक्षी देवलतकर, कु. वैष्णवी पाटील, कु. प्रणाली पाटील, कु. कावेरी अंधारे, कु. सरस्वती वडेबैलकर, कु. विश्रांती मेलगे, कु. मंगल देवलतकर, कु. रेणुका तोरगल आणि कु. ईश्वरी या सर्व खेळाडूंनी यंदाच्या बैलहोंगल येथे झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बेळगाव तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाचा मोठ्या फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत सौंदत्ती तालुक्याच्या बलाढ्य संघाचा दारुण पराभव केला आणि मंड्या येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी निश्चित केली.
योग्य नियोजन, शिस्तबद्ध सराव आणि मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या प्रोत्साहनातून ही फलश्रुती मिळाली आहे. या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी गेली काही वर्षे तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. प्रशिक्षक प्रशांत पाखरे व श्री सर यांचे मार्गदर्शन, खेळाडू विद्यार्थिनींची जिद्द व मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू मॅडम यांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनाने या खेळाडू विद्यार्थिनींचा आत्मविश्वास बळावला असून पुढील सामने जिंकण्याची जिद्द त्यांच्यात बळकट झाली आहे. वेग, चपळाई, समन्वय आणि धैर्य यांचा समन्वय साधत तत्पर निर्णय क्षमतेच्या जोरावर येथील खेळाडू विद्यार्थिनींनी आजवर या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन घडविले आहे.
मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील, श्री. परशरामअण्णा गुरव, काॅलेजचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील यांचा सातत्यपूर्ण भरीव पाठिंबा, तसेच ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहुल जाधव, ज्येष्ठ प्राध्यापक श्री. एन. ए. पाटील, क्रीडा प्रमुख प्रा. श्रीमती एम. वाय. देसाई, प्रा. श्रीमती एस. सी. कणबरकर, प्रा. टी. आर. जाधव, प्रा. श्रीमती जे. एफ. शिवठणकर, प्रा. प्रा. पी. व्ही. कर्लेकर, प्रा. आर व्ही मरित्तमन्नावर, प्रा. श्रीमती व्ही एम गावडे, प्रा. नितीन देसाई व महाविद्यालयातील सर्व कर्मचारीवर्ग, पालक वर्ग आणि प्रसिद्धी माध्यम यांच्या प्रोत्साहनामुळे हा खो- खो संघ राज्यस्तरीय स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाला असून दिनांक 27 नोव्हेंबरला मंड्या येथे रवाना होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta