
खानापूर : खानापूर तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयांच्या “सांस्कृतिक स्पर्धा” सरकारी प. पू. महाविद्यालय, मुगळीहाळ येथे थाटात पार पडल्या. या स्पर्धेत बिडी येथील नेहरू मेमोरियल पदवीपूर्व महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थी- -विद्यार्थिनी घवघवीत यश संपादन केले असून ते या प्रमाणे….
मोनो ॲक्टिंग
कु. दिपा ईटगी प्रथम, तर प्रीया बाबूगौडर हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
लोकगीत
कु. समीर जुंजवाडकर प्रथम
लोकनृत्य
कु. विद्या कम्मार ही प्रथम
क्यूझ
कु. ऐश्वर्या हिरेगौडर, कु. कलमेश कारकद तृतीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचे नावलौकिक वाढविले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजलेल्या या स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील कलावंत विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपले कौशल्य बाणेदारपणे दाखवून दिले आणि “हम किसी से कम नहीं” हे साबित केले. या यशाबद्दल प्राचार्य एल. पी. पाटील, प्राध्यापकवृंद, संस्थेचे चेअरमन महेश बिडीकर, सेक्रेटरी गणू कुलकर्णी, मा. अध्यक्ष डॉ. जी. व्ही. जवळी व संचालक मंडळ व परीसरात शिक्षणप्रेमींनी त्यांचे खूप खूप कौतुक केले आहे.
प्राध्यापिका सौ. भाग्यश्री पुजार, कु. पुजा के. कु. लक्ष्मी आंबोजी, प्रा. गणेश डी. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Belgaum Varta Belgaum Varta