
खानापूर : गोवा सायन्स सेंटर मीरामार, जिल्हा विज्ञान केंद्र गुलबर्गा आणि ज्ञान प्रबोधन शैक्षणिक साधना केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल हलशी तालुका खानापूर येथे सायन्स ऑन विल्स अँड व्हर्चुअल रियालिटी प्रयोग हा उपक्रम शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी शिवाजी हायस्कूल येथे उत्साहात पार पडला. या विशेष विज्ञान उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक वैज्ञानिक शोध संशोधन प्रक्रिया आणि शोधात्मक कौशल्य याबाबत प्रत्यक्ष अनुभवासह मार्गदर्शन करण्यात आले. विज्ञानाच्या विविध शाखांवरील प्रयोग मॉडेल्स आणि डिजिटल माध्यमातून व्हीआर अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांनी विज्ञानाची ओळख नव्या दृष्टिकोनातून करून घेतली. या वैज्ञानिक उपक्रमाचा लाभ शिवाजी हायस्कूलच्या आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अभिनव कल्पकतेतून शैक्षणिक उपक्रम तयार केले होते या प्रकल्पाचे प्रदर्शन परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी ज्ञानदेवान-घेवाण करत विज्ञानाची मैत्री करत यशस्वी उपक्रम घडवून आणला. सदर उपक्रम 22 नोव्हेंबर रोजी देखील शाळेत खुला ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक किरण देसाई यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta