
खानापूर : 17 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या तालुका स्तरावरील विज्ञान वस्तू प्रदर्शनामध्ये श्री चांगळेशवरी शिक्षण मंडळ संचलित हायस्कूल शिवठाणचा विद्यार्थी कुमार पार्थ इसरानी प्रथम आला असून त्याने एक्सीडेंट प्रिव्हेंटेशन मशीन हा प्रयोग सादर केला होता. त्याला शाळेचे मुख्याध्यापक पी. ए. पाटील व विज्ञान शिक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सदर तालुकास्तरावरील विज्ञान प्रदर्शनात एकूण 38 हायस्कूलने भाग घेतला होता. या विज्ञान वस्तू प्रदर्शनाचे आयोजन सार्वजनिक शिक्षण खाते खानापूर करण्यात आले होते विज्ञानाबद्दल दृष्टिकोन विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञान प्रदर्शनच्या आयोजन करण्यात आले. पार्थ इसरानी याने आपल्या प्रयोगाचा उत्कृष्ट नमुना सादरीकरण करून प्रथम स्थान पटकावून शाळेचे व शिक्षकांचे अभिनंदनास पात्र ठरविले आहे. श्री चांगळेशवरी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी प्रसाद मजुकर व चेअरमन श्री. वाय. एन. मजूकर सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta