
खानापूर : जी. ई. सोसायटी संचलित नेहरू मेमोरियल पदवीपूर्व महाविद्यालय बिडीच्या दोन विद्यार्थीनींनी जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले असून, बिडी परीसरात त्यांच्ये खूप खूप अभिनंदन होत आहे.
बेळगांव येथील महेश पी. यू. काॅलेजमध्ये बेळगांव जिल्हा स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले होते. कु. दीपा इटगी या प्रथम पी.यू. सीच्या विध्यार्थींनीने मोनो ॲक्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक तर कु. विद्या कम्मार हिने लोकनृत्य स्पर्धेत दुतीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचे नांवलौकिक वाढविले असून. या विद्यार्थ्यांनींना प्रा. लक्ष्मी आंबोजी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

बिडी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी- विद्यार्थीनींसुध्दा अनेक कलागुणांनी समृद्ध असुन, अभ्यासक्रमासह इतर स्पर्धांनंमध्ये सुध्दा त्यांनी आपली चमक दाखवून दिली आहे. दरवर्षी द्वितीय वर्षाचा निकाल सुध्दा ८५% पेक्षा जास्त असून वाणिज्य विभागाचा निकाल सतत चार वर्षे १००% लागला आहे. एकूणच महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थीनीं खूप मेहनती असून, प्राचार्य एल. पी. पाटील, प्राध्यापक वर्ग आणि संचालक मंडळ यांची क्रियाशीलता आणि मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. जिल्हास्तरीय सांस्कृतीक स्पर्धेत दोन विद्यार्थीनींनी उत्तम यश संपादन केल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात एक मोलाचा तुरा खोवला गेला आहे. या यशाबद्दल बिडी परीसरात या विद्यार्थ्यांनींचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta