Sunday , December 7 2025
Breaking News

जांबोटी माध्यमिक विद्यालयात परमवीरांचे पूजन

Spread the love

 

खानापूर : परमवीरचक्रानी सम्मानीत आपल्या शुरविरांकडून आपण सदैव प्रेरणा घेउया व देशासाठी आपण सकारात्मक कार्य करुया. आता देशासाठी मरण्यापेक्षा सजग नागरिक म्हणून जगुया, असे विचार किशोर काकडेनी मांडले. विश्व भारत सेवा समिती संचलित जांबोटी माध्यमिक विद्यालयात झालेल्या परमवंदना या परमवीरचक्रानी सम्मानित 21वीराना पुष्पांजली अर्पण करुन त्याना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्री. कृष्णानंद कामत होते.
व्यासपीठावर जांबोटी गावातील माजी सैनिक श्री. चंद्रकांत देसाई, श्री. बळवंत इंगळे, श्री. पावनाप्पा रमेश देसाई, श्रीदत्तात्रय इंगळे, श्री. पावनाप्पा मारुती देसाई हे उपस्थित होते. मुख्याध्यापक महेश सडेकरानी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि ऐ मेरे वतन के लोगो गीत छान सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती लक्ष्मी पूजन तसेच 21 परमवीरचक्र विजेत्यांच्या प्रतिमांचे, भारत माता की जयच्या घोषणेसह पूजन करण्यात आले. माजी सैनिक चंद्रकांत देसाईनी आपल्या सैनिक जीवनातील आठवणी सांगितल्या. सर्व मान्यवरांचे पुष्प देउन स्वागत करण्यात आले. देव देश आनी धर्मापायी प्रान घेतल हाती अशा गाण्यानी सुरुवात करीत 18.11.1962 लाच चीनी युध्दात हौतात्म्य पत्करुन परमविर चक्र मिळविणाऱ्या मेजर शैतानसिंग याची कथा काकडैनी सांगितली. त्याचबरोबर कारगिल युध्दात 17 गोळ्या झेलून जीवंत राहणारे योगेंद्र सिंग आणि ये दिल मांगे मोर म्हणत हुतात्मा झालेल्या विक्रम बत्राचीही कहाणी सांगत हे पराक्रम आपल्याला शुरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर तानाजी मालुसरे सारख्यांची आठवण करुन देतात असे सांगितले. अशोक चक्र मिळविणारी हुतात्मा निरजा बानोद व परमवीर चक्र तैयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकरांची माहिती देत 2047 चा विकसित भारत घडविण्यासाठी सैन्यात भरती व्हा आणि देश की हम करेंगे अशी शपथ घ्या असे काकडेनी सांगितले.

श्री. कृष्णानंद कामजीनी पण आपले मनोगत व्यक्त करीत विध्यार्थ्यांना देश प्रथम हा विचार समोर ठेवा असे सांगितले. सहशिक्षिका सौ. सुजाता चलवेटकर यांनी सूत्रसंचालन केले व श्री दिनकर पाटील यांनी आभार मानले. किशोर काकडेंच्या संपूर्ण वंदेमातरम गायनानी सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरांतर्गत रस्त्याचा विकास आराखड्यानुसारच!

Spread the love  आमदार विठ्ठल हलगेकर यांची वकील संघटनेच्या शिष्टमंडळाला ग्वाही! खानापूर : खानापूर शहरांतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *