

खानापूर : खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन रवींद्र गणपतराव देसाई (वय 74 वर्ष) यांचे आज मंगळवार दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. मूळचे कापोली (ता. खानापूर) येथील रहिवासी असलेले रवींद्र देसाई हे बऱ्याच वर्षांपासून हिंदवाडी, बेळगाव येथे वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाने खानापूर-हिंदवाडी बेळगाव परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार व भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कै. निळकंठराव भगवंतराव देसाई यांचे ते जावई होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित कन्या, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी उद्या बुधवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता कापोली (ता. खानापूर) येथे त्यांच्या मूळ गावी होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta