
खानापूर : स्टेशन रोडवरील आशीर्वाद हॉस्पिटल सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आशीर्वाद हॉस्पिटल व श्री आर्थो आणि ट्रॉमा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील सर्व डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी, सायकीयाट्री (मानसोपचार), त्वचारोग, दमा व छाती विकार, स्पाइन, हाडांचे रोग यांसह विविध स्पेशालिटी तज्ज्ञांकडून सेवा उपलब्ध आहेत. तसेच डॉ. विनोद माळी (M.D. मेडिसिन) यांच्याकडून २४×७ मेडिसिन सेवा रुग्णांना पुरवली जात आहे. या सुविधांचा लाभ अधिकाधिक सर्वसामान्य रुग्णांना मिळावा, यासाठी खानापूरातील डॉक्टर्स एकत्र येऊन टीमवर्क करत असल्याचे विशेष कौतुक या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात बेळगाव येथील डॉ. देवेगौडा यांनी बोलताना डॉक्टरांच्या टीमवर्कचे कौतुक करत रुग्णसेवा अधिक परिणामकारक करण्याचा संदेश दिला.
तसेच डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी अधिकाधिक डॉक्टरांनी असोसिएशनमध्ये सहभागी व्हावे, तसेच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुपर स्पेशालिस्ट सेवा गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. शंकर पाटील, डॉ. एन. एल. कदम आणि डॉ. सुनील पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला खानापूर, हलशी, नंदगड, जांबोटी, रामनगर येथील सुमारे 50 डॉक्टर्स उपस्थित होते. त्यापैकी प्रमुख उपस्थित डॉक्टरांमध्ये डॉ. सागर चिठ्ठी, डॉ. पी. एन. पाटील, पी. बी. चिठ्ठी, डॉ. श्रीकांत घाडी, डॉ. वैभव भालकेकर, वैभव पाटील, डॉ. नंद्याळकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत डॉ. राम पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मदन कुंभार यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta