
खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथील विद्यार्थ्यांना लोंढा अरण्य विभाग व कर्नाटक सरकार यांच्या चिन्णर वनदर्शन अंतर्गत करंबळ ट्री पार्क, राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय व हेमडगाव सदाहरित जंगलाला शैक्षणिक भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी जैवविविधता, लायकेन-शेवाळे, सदाहरित जंगलाची वैशिष्ट्ये व वन्य प्राण्यांच्या पाऊलखुणांचा प्रत्यक्ष अभ्यास केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी लोंढा नर्सरीमध्ये रोपलागवड प्रक्रिया जाणून घेतली तसेच गुंजी येथील जिल्ह्यातील एकमेव टिंबर डेपो पाहून विविध लाकडांची माहिती मिळवली. दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे पर्यावरणविषयक ज्ञान समृद्ध झाले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक पी. ए. पाटील, शिक्षकवर्ग तसेच अरण्य विभागाचे ए. आर. एफ. ओ. नंदपगोळ, महादेव आप्पा व मलप्पा यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी प्राणी, पक्षी, वनस्पती व कीटकांचा अभ्यास करून समाधान व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta