Sunday , December 7 2025
Breaking News

पंच गॅरंटी योजनेमळे कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला

Spread the love

 

पंच गॅरंटी योजनेच्या शिबिराला मोठी उपस्थिती, विविध मान्यवरांची उपस्थिती.

नंदगड : कर्नाटक सरकारने अडीच वर्षांपूर्वी निवडणुकीच्या वेळी पंच गॅरंटी योजना जनतेसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना, युवा निधी आदी पंच गॅरंटी योजना सुरू केल्या.
आत्तापर्यंत साधारणता सर्वच लोकांच्या पर्यंत ही योजना पोहोचत आहे. काही तांत्रिक कारणामुळे हाताच्या बोटावर मोजण्या इतपत महिलांना या योजना मिळाल्या नाहीत. त्यांनाही योजना पोचवण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत.
राज्यातील जनतेचे जीवनमान सुधारावे त्यांचा आर्थिक स्तर वाढावा हाच उद्देश ठेवून ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाची कास धरावी, असे आवाहन पंच गॅरंटी योजनेचे जिल्हा अध्यक्ष विनय नावलकट्टी यांनी केले आहे.

नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीच्या सभागृहात नंदगड
हेब्बाळ व कसबा नंदगड ग्राम पंचायतच्या हद्दीतील जनतेसाठी पंच गॅरंटी योजनेच्या प्रगतीचे परीक्षण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका पंच गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी होते.
यावेळी खानापूर तालुका पंच गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी बोलताना म्हणाले, खानापूर तालुक्यासाठी पंच गॅरंटी योजनेसाठी समिती बनवण्यात आली. जिल्हा पालकमंत्री सतीशअण्णा जारकीहोळी, माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या शिफारशीनुसार समिती बनवण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली. माझ्या नेतृत्वाखालील समितीच्या सर्व सदस्यांनी प्रामाणिकपणे कार्य बजावून तालुक्यातील जनतेपर्यंत पंच गॅरंटी योजना पोचवण्यासाठी विशेष दखल घेतली आहे. त्यापैकीच अन्नभाग्य योजनेचा विचार करता खानापूर तालुक्यातील रेशन दुकानदार व्यवस्थितपणे रेशनचा पुरवठा करत आहेत. शक्ती योजनेचा सदुपयोग जनतेला व्हावा, यासाठी खानापूर आगारात रोज भेट देऊन त्याची पाहणी करत आहे. खानापूर तालुक्याचा बहुतांश भाग जंगलमय भागात वसलेला आहे. त्यामुळे अनेक वेळा तालुक्यातील काही गावातून वीजपुरवठा खंडीत होतो. अशावेळी मी स्वतः जनतेचा कॉल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतो. जास्तीत जास्त युवकांनी युवा निधीचा उपयोग घेतला असून त्यांचे भावी जीवन यशस्वी व्हावे यासाठी वेळोवेळी शिबिराद्वारे मार्गदर्शन ही करीत आहे.
शिबिराला पंच गॅरंटी योजनेचे जिल्हा उपाध्यक्ष रुद्रय्या हिरेमठ, खानापूर तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री, नंदगड ग्रा.पं. अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महातेश राऊत, क. नंदगड ग्रा.पं. अध्यक्षा नेत्रावती लोहार, मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन श्रीशैल माटोळी, पंच गॅरंटी योजनेचे पदाधिकारी, नंदगड, हेब्बाळ व क. नंदगड ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नंदगड ग्रामपंचायतचे अध्यक्ष यलाप्पा गुरव आदी सह अन्य मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

-पंच गॅरंटी योजनेतून या लघुउद्योग
पंच ग्यारंटी योजनेच्या रकमेतून या भागातील महिलांनी लघु उद्योग सुरू केले आहेत. लघु उद्योग सुरू केल्याबाबतची माहिती दीपा बजंत्री, निर्मला देसाई, लक्ष्मी राऊत, प्रार्थना नाईक आदींनी भाषणाच्या दिली. अन्य महिलांनी ही गृहलक्ष्मी योजनेतून स्व उद्योग सुरू करावेत असे आवाहन ही केले.
या वेळी प्रास्ताविक प्रकाश मादार यांनी तर सूत्रसंचालन काशिम हट्टीहोळी यांनी केले. आभार बाबू हत्तरवाड यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

वाघाच्या हल्ल्यात गोठ्यात बांधलेली गाय ठार

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील वरकड गावामध्ये शनिवार मध्यरात्रीच्या सुमारास एका वाघाने गोठ्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *