
आमदार विठ्ठल हलगेकर यांची वकील संघटनेच्या शिष्टमंडळाला ग्वाही!
खानापूर : खानापूर शहरांतर्गत जाणाऱ्या 14 कोटीच्या रस्त्याच्या विकासाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पण या रस्त्याचे काम आराखड्यानुसार होत नसल्याचा दावा सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रातून खानापूर तालुका वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. याची दखल घेऊन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बुधवारी खानापूर तालुका वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्याचे निवारण केले. यावेळी शहरांतर्गत जाणारा 14 कोटीचा रस्ता हा आराखड्यानुसारच केला जाणार आहे. काही ठिकाणी डांबरीकरण खुदाई करून त्यावर कॉंक्रिटीकरण आहे तर काही ठिकाणी आहे त्या डांबरीकरणावर काँक्रिटीकरण करण्याचा आराखडा आहे. यासंदर्भात आपणही संबंधित खात्याला सूचना केल्या आहेत. केलेल्या आराखड्यात कोणताही कसूरपणा झाल्यास तसेच जनतेची तक्रार आल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल तसेच रस्त्याच्या दुतर्फा मुरूम व नागरिकांना त्रास होणार नाही. याची दखल घेतली जाईल अशी ही ग्वाही आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या शिष्टमंडळाला दिली.
दरम्यान तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी रस्त्या संदर्भात होत असलेल्या त्रुटी याची माहिती दिली शिवाय न्यायालयाच्या समोरच्या बाजूला हलकर्णी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या जागेवर प्रशस्त असे संकुल उभा करून त्यामध्ये वकील संघटनेच्या कामकाजासाठी एका हॉलची उभारणी करून देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली. दरम्यान आमदाराने देखील या जागे संदर्भात लवकरच निर्णय घेऊन या परिसराच्या सुधारणेसाठी व स्वच्छतेसाठी आपण क्रम घेणार असल्याचे सूचित केले.
यावेळी वकील संघटनेचे पदाधिकारी वकील एच. एन. देसाई, व्ही. एन. पाटील, चेतन मनेरिकर, एम. आय. पाटील, मुल्ला, कदम, लोटूरकर, जीडीएस नेते रेवणसिद्धया हिरेमठ यासह अनेक जण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta