
खानापूर : खानापूर तालुक्यातील श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या सौजन्याने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “एस.एस.एल.सी. व्याख्यानमाला 2025–26” चे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता श्री महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकट्टी येथे श्री. पी. रामाप्पा B.E.O, खानापूर श्री. मंजूनाथ हत्ती BRC, खानापूर श्री. संतोष नाईक BRP, खानापूर श्री. शंकर कमार EIERT आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दिनांक 28-12-2025 रोजी विषय कन्नड श्री. टी. आर. पत्रि, 04-01-2026 रोजी विषय मराठी श्री. एन. टी. मेलगे, 11-01-2026 विषय सायन्स श्री. एस. व्ही. भातकांडे, 18-01-2026 रोजी विषय इंग्रजी श्री. एस. एस. लाड, 25-01-2026 रोजी विषय गणित श्री. एस. एम. वडेबैलकर, 01-02-2026 रोजी समाज शास्त्र श्री. जी. एस. धामणेकर यांचे व्याख्यान होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta