Tuesday , March 3 2026
Breaking News

हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे कणकुंबी भागात जनजागृती

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १७) खानापूर तालुक्यातील जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा तसेच सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यासाठी आज शुक्रवार दि. १६ रोजी कणकुंबी येथील माऊली देवी पासून बाजार पेठेत पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.
खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, खानापूर तालुका सरचिटणीस आबासाहेब दळवी, मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य गोपाळराव पाटील, मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य पांडुरंग सावंत, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य रवींद्र शिंदे, मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य राजाराम गावडे, अंकुश महाजिक चोर्ला, अनंत भिवा वाडेकर, भिकाजी महाले, गोपाळ गावडे, निंगाप्पा महार, चंद्रकांत गावडे, चिंगुळ गावडे, मोतीराम गावडे, महादेव नाईक, विठ्ठल कांबळे, बाळू गावडे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *