खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्राथमिक व हायस्कूलच्या वतीने गावामध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. प्रथमता प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण श्री. विकास मिराशी, तर हायस्कूलचे ध्वजारोहण माजी सैनिक व माजी विद्यार्थी श्री. सुरेश पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सैनिक श्री. नामदेव मुघवडेकर (माचाळी) उपस्थित होते अनेक विद्यार्थ्यांनी आपली भाषणे व देशभक्तीपर गायन सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पी. ए. पाटील सर होते. व्यासपीठावर प्रल्हाद मिराशी (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, गोवा), संभाजी मिराशी, विकास मिराशी, नारायण मिराशी, महादेव हलगेकर इत्यादी शिक्षणप्रेमी उपस्थित होते..
या निमित्ताने दुबई स्थित माजी विद्यार्थी श्री. बाळू पु. हलगेकर यांनी शाळेला साऊंड सिस्टिम भेट दिली. तसेच सेवानिवृत्त माजी सैनिक, माजी विद्यार्थी श्री. सुरेश पवार, श्री. नामदेव मुगवडेकर व श्री. प्रल्हाद बिदर भावी यांच्या संयुक्त देणगीतून शाळेला प्रोजेक्टर देण्यात आला. सर्व देणगीदारांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापकांनी केले. सूत्रसंचालन टी. वाय. आळवणी व व्ही. बी. पाटील आभार प्रदर्शन केले. यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.व्ही. नाईक, पि. टी. चोपडे, एन. जी. गावडा, एम. एस. कदम, बी. वी. पाटील, एस. एस. काजुनेकर आणि सायनेकर यांनी परिश्रम घेतले. शेवटी वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta