Tuesday , March 3 2026
Breaking News

कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही; पंच गॅरेंटी हमी योजनेची मासिक बैठक संपन्न

Spread the love

 

खानापूर : पंच गॅरेंटी हमी योजनेची मासिक बैठक आज रोजी दिनांक 27-1-2026 तालुका पंचायत खानापूर येथे संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष खानापूर तालुका गॅरेंटी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. गॅरंटी योजनेच्या बैठकीमध्ये पाच गॅरंटी विषयी त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची माहिती घेतली

गृहज्योती योजनेचे अधिकारी प्रवीण बरगाले यांनी गृहज्योती विषयी बोलताना म्हणाले, खानापूर तालुक्यामध्ये गृहज्योतीचे लाभार्थी 63 हजार 239 एवढे असून डिसेंबर महिन्यामध्ये एक कोटी 96 लाख वीज बिल माफ झाले आहे, व तालुक्यातील काही समस्या योजनेच्या गॅरेंटी सभासदाकडून त्यांनी ऐकून घेऊन त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांना सांगून सुरळीत वीजपुरवठा करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले.

शक्तीयोजना या योजनेचे अधिकारी शंकर कल्लाप्पा दुर्गावी, डेपो नियंत्रक यांनी माहिती दिल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यातील शक्ती योजना म्हणजे महिला प्रवासी 746485 महिलांनी प्रवास केला आहे त्याची रक्कम 20030266 रुपये इतके खानापूर डेपोतून मोफत रक्कम झाले आहे, यावेळी गॅरेंटी योजनेचे सदस्य रुद्राप्पा पाटील यांनी अधिकाऱ्यांना एक सूचना केली. इदलहोंड व्हाया सिंगिंनकोप जाणारी बस तशीच पुढे जाऊन माळअंकले, झाडअंकले मार्गे खानापूरला चालू करावी अशी मागणी केली.

गृहलक्ष्मी या योजनेच्या अधिकारी असिस्टंट सिडीपीओ मॅडम शारदा मराठे म्हणाल्या, खानापूर तालुक्यामध्ये गृहलक्ष्मी योजनेचे लाभार्थी 66 हजार 334 इतके आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत दोन हजार रुपये प्रमाणे त्यांच्या अकाउंटला जमा झाले आहेत, व आयटी जीएसटी 195 लाभार्थी असून त्यांना या गृहलक्ष्मी योजनेचे रक्कम येत नाही झाले आहे त्यासाठी ज्यांच्या आयटी जीएसटी नसून सुद्धा आयटी जीएसटी आली आहे त्याची शहानिशा करायला चालू आहे ते झाल्यानंतर त्यांना पण याचा फायदा मिळेल असे सांगण्यात आले.

यावेळी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी सांगितले की, गृहज्योती विभागातील सीडीपीओ निलंबित झाले आहेत. त्या जागी जे कोणी असतील त्यांनी गॅरेंटी योजनेच्या गृहलक्ष्मी योजनेसाठी काही सूचना असतील खानापूर तालुक्यातील तात्काळ पूर्ण कराव्यात, कामचुकारपणा करू नये असा दम दिला आहे, कामचुकारपणा केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. गॅरेंटी योजनेचे सदस्य किंवा अध्यक्ष सहन करणार नाहीत एवढी ताकीद ही दिली आहे. युवा निधीचे अधिकारी यावेळी बैठकीला गैरहजर राहिले त्याबद्दल त्यांना नोटीस बनवण्यात यावी असा ठराव करण्यात आला आहे. या योजनेमध्ये अतिमहत्त्वाची योजना असलेले अन्नभाग्य योजना या योजनेची माहिती देताना डेप्युटी तहसीलदार आनंद एस. जांभळे व अन्नभाग्य निरीक्षक उदय खातेदार उपस्थित होते, यावेळी त्यांनी रेशन वितरणाबाबत बरीच माहिती दिली, त्या बैठकीमध्ये गॅरेंटी योजनेचे सदस्य प्रकाश मादर यांनी अन्नभाग्य योजनेतील बऱ्याच गोष्टी उजेडात आणल्या त्यामध्ये गॅरेंटी योजनेच्या सदस्याने माहिती मागवलेली आतापर्यंत व्यवस्थित दिलेली नाही व नवीन रेशन कार्ड वितरणामध्ये बराच घोळ चाललेला आहे त्यामध्ये दोघे अन्नभाग्य निरीक्षक उदय खातेदार व संतोष यमकनमर्डी या दोघांनी रेशन कार्ड वितरणामध्ये शहानिशा व्यवस्थित न करता रेशन कार्ड वाटप चालू केले आहे यामध्ये ऑनलाइन अर्जदार दुकानदार व अन्य विभाग अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे झाले? का असा संशय येत आहे, कारण गॅरेंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी अन्नभाग्य विभागाला एक नोटीस दिली होती की नवीन रेशन कार्ड ज्या ज्या पंचायतीला आपण दिला आहात त्यांच्या नावाची यादी जाहीर करा असे लेखी स्वरूपात अर्ज दिला होता पण त्याचे उत्तर फक्त आकडेवारीमध्ये देण्यात आले आहेत त्यामुळे देवाण-घेवाण झाल्याचा अधिकच संशय येत चालला आहे त्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करून फेरतपासणी करण्यात यावी असे योजनेच्या माध्यमातून तक्रार करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.

यावेळी या बैठकीमध्ये गॅरंटी योजनेचे सदस्य प्रकाश मादार, बाबू हत्तरवाड, इसाखान पठाण, जगदीश पाटील, रुद्राप्पा पाटील, गोविंद पाटील, युसुफ हरगी, प्रियांका गावकर, दीपा पाटील, शांताराम गुरव, राजा कुडाळे, विवेक तडकोड, संजय गावडे, योजनेचे कार्यदर्शी रमेश मेत्री, उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक श्रीकांत सपटला यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *