
खानापूर : तातडीच्या देखभाल व दुरुस्ती कामांमुळे उद्या रविवार दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती हेस्कॉम विभागातर्फे देण्यात आली आहे.
33 के.व्ही. खानापूर उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या रुमेवाडी क्रॉस, दुर्गा नगर, खानापूर स्टेशन रोड, नागरगाळी, नागरगाळी रेल्वे स्टेशन, मुंडवाड, कुंभारडा, तारवाड, भालके बी.के., भालके के.एच., शिंदोळी, होनकल, सावरगाळी, अबनाळी, गवाळी, कोंगळा, आंबेवाडी, तिवोली, ढोकेगाळी, खानापूर शहर, शिवाजी नगर, रुमेवाडी, ओतोळी, मोदेकोप्प, नागुर्डा, रामगुरवाडी, आंबोळी, हरसनवाडी, असोगा, नेरसा, अशोक नगर, मंतुर्गा, शेडेगाळी तसेच हेम्माडगा या भागांमध्ये वीजपुरवठ्यात अनियमितता राहणार आहे.
तसेच संबंधित गावांतील सिंचन पंपसेट क्षेत्रांनाही याचा परिणाम होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन हेस्कॉम विभागातर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta