Tuesday , March 3 2026
Breaking News

राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. एस. कदम सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा तसेच डोळसपणाने त्यांना प्रत्येक गोष्टीचे ज्ञान प्राप्त व्हावे याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विज्ञान शिक्षिका श्रीमती व्ही. एल. चौगुले यांच्या शुभहस्ते सर सी व्ही रामन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले मुख्याध्यापक सी. एस. कदम सर व ए. जे. सावंत सर यांच्या शुभहस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत सादर केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे सादर केली, मुख्य मार्गदर्शक म्हणून व्ही. एल. चौगुले टीचर यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व समजावून सांगताना डोळसपणाने आपण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा शोधून काढली पाहिजेत तरच आपल्याला खऱ्या अर्थाने विज्ञान समजेल असे नमूद केले. अध्यक्ष समारोपात मुख्याध्यापक सीएस कदम सरांनी विद्यार्थ्यांना सर सी. व्ही. रामण यांच्या रामन इफेक्टचे विश्लेषण करून नोबल पारितोषिकची माहिती करून दिली. आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान किती महत्त्वाचे ठरते हे पटवून दिले. शेवटी विज्ञान दिनाची प्रतिज्ञा सर्वांना घेतली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक जे. ए चापगावकर यांनी तर आभार विद्यार्थिनी गौतमी डिचोलकर हिने मांडले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *