Tuesday , March 3 2026
Breaking News

चन्नेवाडीच्या युवकांचे कौतुकास्पद कार्य

Spread the love

 

खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथील बसशेड हे गेली कित्येक वर्षे रंगरोटी विना जीर्ण झाले होते. तसेच हे शेड गाववस्तीपासून अर्धा किलोमीटर दुर असल्याने तेथून येजा करणाऱ्या मद्यपींचा अड्डा बनले होते. त्यामुळे ते अस्वच्छ बनले होते.

आज होळी सणाला काही युवकांनी याचे औचित्य साधून झाडाझुडपांनी व्यापलेल्या या बस शेडचा परिसर श्रमदानाने स्वच्छ केला व स्वखर्चाने शेडची रंगरोटी करून नवीन रूप दिले. युवकांनी केलेल्या या कार्याला गावातील व येजा करणाऱ्या प्रवाशांनी कौतुकाची थाप दिली.

या परिश्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुहास यांचे मार्गदर्शन तर सौरभ पाटील, वेदांत पाटील, प्रेमानंद पाटील, सर्वोत्तम पाटील, कार्तिक पाटील, धीरज पाटील, गणेश पाटील, अंकुर पाटील, भरमु पाटील यांनी भाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Spread the love  खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन शाळेचे मुख्याध्यापक श्री. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *