खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या वेशीत नव्याने उभारण्यात आलेल्या बस शेडसाठी वाळू, खड्डी व इतर साहित्य लक्ष्मीमंदिराच्या समोर आणून टाकण्यात आले आहे. त्यातच बस शेडचेही काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर टाकलेल्या वाळू, खड्डी व इतर साहित्याची वाहतुकीला तसेच गावच्या नागरिकांना ये-जा करताना याचा त्रास सहन करावा लागतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराचा लवकरच लोकार्पण सोहळा होणार आहे. यासाठी या ठीकाणी सोहळ्याच्या तयारी लसाठी वर्दळ वाढत आहे. त्यातच बस शेडच्या समोर टाकलेल्या वाळू, खड्डी, व इतर साहित्याचा अडथळा होत आहे. हे साहित्य टाकलेला कंत्राटदार काम अर्धवट टाकून बेपत्ता झाला आहे. तेव्हा संबंधित कंत्राटदाराने ताबडतोब रस्त्यावरचे साहित्य हालवावे व रस्ता रहदारीला मोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांतुन होत आहे. आमदार फंडातुन होत असलेले बस शेडचे काम असल्याने आमदारांनी याकडे लक्ष देऊन सहकार्य करावे, अशी ही मागणी होत आहे.
