खानापूर : हिरेबागेवाडीजवळ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका ग्रामपंचायत सदस्याचा जागीच मृत्यू झाला.
खानापूर तालुक्यातील अवरोळी गावातील रहिवासी आणि कोडचवाड ग्रामपंचायतीचे चार वेळा सदस्य राहिलेले राजूगौडा पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला. ते भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.
माहितीनुसार, राजूगौडा पाटील मंगळवारी सकाळी त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून बेळगाव शहरात गेले होते. संध्याकाळी घरी परतत असताना हिरेबागेवाडी गावाजवळ त्यांची दुचाकी आणि कारमध्ये अपघात झाला.
अपघातादरम्यान राजुगौडा पाटील हे दुचाकीवरून पडले आणि महामार्गाच्या उजव्या बाजूला फेकले गेले. त्याच वेळी मागून येणाऱ्या बसचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. या अपघातात त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली परंतु त्या सुखरूप बचावल्या.
याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिस पुढील तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta