Monday , June 22 2026
Breaking News

रमजान पर्वाच्या अंतिम खंडास प्रारंभ; मुस्लिम बांधवांना रमजान ईदचे वेध

Spread the love

 

निपाणीत खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

निपाणी (वार्ता) : रमजान ईदचे २० रोजे (उपवास) मंगळवार (ता.१०) रोजी पूर्ण झाले. त्यानिमित्ताने मगफिरत दुसऱ्या आशरा (खंड) ची सांगता झाली. बुधवार (ता.११) पासून तिसन्या आणि अंतिम खंडाची सुरवात झाली आहे. त्यानिमित्ताने उपवासाचे पदार्थ कपडे व इतर साहित्यांची खरेदीसाठी येथील बाजारपेठेत गर्दी होत आहे.
रमजान पर्व तीन खंडात साजरा केला जातो. रमजान पर्वात २९ अथवा ३० रोजे येतात. त्यानुसार १० रोजाचा एक आशय (खंड) असतो. शनिवार (ता. २८) रोजी पहिले १० रोजी पूर्ण होऊन पहिल्या रहमतचा खंडाची समाप्ती झाली. रविवार (ता.२९) पासूर दुसऱ्या आशयस प्रारंभ झाला होता. मंगळवारी (ता.१०) सायंकाळी अशा मगफिरतच्या दुसऱ्या खंडाचाही समारोप झाला. तर बुधवारी (ता.११) पासून तिसऱ्या खंडाच सुरवात झाली आहे. या खंडास अनन्य साधारण महत्व आहे. जाहअम (नरका) पासून मुक्ती मिळण्याचे दिवस या खंडात असतात. तसेच काही मुस्लिम
बांधव याच खंडात ऐतेकाफमध्ये बसत असतात. दुसऱ्या खंडाचा समारोप होताच मुस्लिम बांधवांना रमजान ईदचे वेध लागले आहे. ईदची विविध प्रकारच्या खरेदीसाठी त्यांच्याकडून बाजारात गर्दी केली जात आहे. चिमुकल्यांकडूनही रोजे केले जात आहेथ. अगदी तीन वर्षापासूनच्या चिमुकल्यांचा यात समावेश आहे.
——————————————————————–
ऐतेकाफची परंपरा टिकून
रमजान पर्वातील तिसऱ्या खंडात महिला आणि पुरुष ऐतेकाफमध्ये बसतात. पुरुष मंडळीकडून १० दिवस मशिदीच्या एका कोपऱ्यात वास्तव्य करतात. तेथेच कुराण पठण करणे, जेवण करणे, नमाज पठनासह आणि अन्य विविध प्रकारची इबादत केली जाते. तर महिला घराच्या एका कोपऱ्यात ऐलेकाफमध्ये बसतात. रमजान ईदचे चंद्रदर्शन घडताच ऐतेकाफमधून बाहेर पडण्याची परंपरा आहे.

About Belgaum Varta

Check Also

अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना

Spread the loveमिनाक्षी पाटील; बोरगाव येथे स्वयंपाक गॅसचे वितरण निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकारत्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *