Monday , June 22 2026
Breaking News

जांबोटीत सायकल स्पर्धेचा थरार, दत्तराज सडेकर याने मारली बाजी

Spread the love

 

जांबोटी : जिंकण्यासाठीचा प्रचंड आत्मविश्वास त्यातून चाकाने घेतलेला भरधाव वेग, प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून पुढे जाण्याची धडपड, अन प्रेक्षकात होणारा जल्लोष असा सायकलिंग स्पर्धेचा थरार जांबोटी येथे अविस्मरणीय ठरला.

गिअरहेड स्टुडिओज बेळगाव व विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय जांबोटी यांच्या संयुक्त विद्यमाने सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संरक्षण व जागृतीसाठी परिसरात पहिल्यांदाच अशा सायकलींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 45 शालेय विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. दत्तराज सडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर परशराम कुलम व शंकर हनबर द्वितीय व तृतीय ठरले. मुलींच्या गटात कु. शिवानी जंगले, कु. अक्षरा गंगाराम गावडे कु.गौरी कृष्णा भंडारी या अव्वल ठरल्या.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदीहळी हे होते. माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम कृष्णाजी देसाई, निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल रामचंद्र देसाई, नागोजी आप्पाजी सडेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग काळाप्पा गुरव, निवृत्त जवान रवींद्र गुंडराव देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. मूळच्या हिंडलगा येथील व सध्या अमेरिकेत संशोधन कार्य करणाऱ्या श्रीमती अरुणा पावशे यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन झाले. गिअरहेड स्टुडिओ बेळगावचे मालक श्री. रमेश देसाई, निवृत्त मुख्याध्यापिका सौ. मीना देसाई यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी रोहन देसाई, सौ. पल्लवी देसाई, हिंडलगा हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक रवींद्र तरळे आदी मान्यवर व्यासपीठावर होते. जांबोटी हायस्कूलचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी उपस्थित यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. शास्त्रज्ञ श्रीमती अरुणा पावशे, रमेश देसाई, विजयराव नंदीहळी, जयराम देसाई यांची समायोचीत भाषणे झाली. सुनील ठाणब, दिनकर पाटील, तुकाराम सडेकर, महेश साबळे, सिद्धारूढ पाटील, सुजाता चलवेटकर यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कणकुंबी माऊली विद्यालयाचे अध्यापक श्री. नागेंद्र करंबळकर यांनी आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

काटगाळीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला; महिला व बालविकास विभागाची तात्काळ कारवाई

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील काटगाळी गावात अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याची तयारी सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *