Monday , April 13 2026
Breaking News

माजी विद्यार्थ्यांनी दिली शाळेला ग्रंथालयाची भेट

Spread the love

 

खानापूर : नंदगड (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक संत मेलगे शाळेच्या १९८८-८९ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला.

गेल्या आठ दिवसापासून विद्यार्थ्यांनी श्रमदान व स्वखर्चाने ग्रंथालय खोलीची डागडुजी व रंगकाम करून खोलीचे सुशोभीकरण केले व परिसराची स्वछता केली होती.

शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शाळेच्या गेटवर तसेच प्रांगणात रांगोळी काढून माजी विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल ताश्याच्या गजरात व पुष्पवृष्टी करून करण्यात आले.

त्यानंतर ग्रंथालयाचे उद्घाटन शाळेच्या माजी शिक्षिका श्रीमती गीता विष्णू मठस्थ यांच्या हस्ते फीत कापून व ग्रंथालयात पुस्तके ठेवून करण्यात आले. त्यानंतर आजी माजी विद्यार्थी यांची सभा पार पडली, सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते मुख्याध्यापक सुरेश बा. मादार हे होते तर व्यासपीठावर नूतन मुख्याध्यापिका कल्पना गाडगीळ, माजी शिक्षिका गीता मठस्थ, प्रकाश मादार, संध्या अडली, जयश्री कुरिया, एस. डी. बोगुर,परशराम शिंदे होते.

माजी विद्यार्थ्यांचे तत्कालीन शिक्षक जे दिवंगत झाले मधुकर पांगम, जे.जे.पाटील, शंकर पाटील, लक्ष्मण पाटील, महादेव पाटील, शांताबाई ढोरी व सुशीलबाई शहापुरकर तसेच बॅचचे दिवंगत विद्यार्थी रमेश गुंडानी, मारुती देसुरकर, शंकर डवरी व पद्मा पाटील यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत गायिले, त्यानंतर पूर्वीची प्रार्थना ईशप्यारे ही गाण्यात आली, दीपप्रज्वलनाने व सारस्वती फोटो पूजनाने व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत करताना सुरेश पाटील यांनी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाजूला सारावा व यशस्वी वाटचाल करावी असे सांगितले,

धनंजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अनेक माजी विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले असून पुढील काळात माजी विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत राहावे तसेच आपली मराठी भाषा व संस्कृती जपावी, असे सांगितले.

खास टांझानिया (दक्षिण आफ्रिका) येथून सुशांत पाटील यांनीही व्हिडिओ द्वारे आपले मनोगत व्यक्त केले.

चंदा बावकर हिने संत मेलगे शाळेचा इतिहास सांगत आपले अनुभव कथन केले, अन्नपूर्णा पाटील, सविता पाटील, ज्योती पाटील, बाबुराव सुतार, सिद्धार्थ पाटील, पुंडलिक पाटील, नारायण पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात ग्रंथालय देणगी ही अविस्मरणीय भेट असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचा निश्चित फायदा होईल, असे सांगितले.

आभार प्रदर्शन सातेरी पाटील यांनी केले व वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी माजी विद्यार्थी शिवानंद करविनकोप, संभाजी परीट, संजय बिडकर, संभाजी पाटील, गजानन बावकर, जितेंद्र पांगम, मिलिंद दलाल, छाया पाटील, सुनिता ऱ्हाटोळकर, रेणुका ऱ्हाटोळकर, दीपा पाटील, महादेवी नावजेकर, संगीता पाटील, तुळसा केसरेकर, शोभा नावजेकर, गौराताई चन्नेवाडकर, देवयानी पाटील, मोहन करडी, मोहन धबाले, लक्ष्मण पाटील, इराप्पा पाटील, मुस्ताक बेपारी, राम पाटील, मलप्रभा पाटील, छाया पाटील, सुनिता पाटील, कविता पाटील, सुषमा पाटील, द्वारका आजरेकर, सुनिता पाटील, सुनंदा कुंभार, अंजना कुंभार, अरुणा कुंभार, द्रोपदी बाचोळकर, रेणुका पाटील, सावित्री पाटील, मोहन गुरव, परशुराम बागडी, शिवाजी कुरिया, अब्दुल तहसीलदार, अफसर तहसीलदार, दत्तात्रय देसुरकर, अंजना पाटील, रेखा पाटील हे विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरमधील ऐतिहासिक हलशी गावात महालक्ष्मी यात्रा उत्साहात

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक प्रसिद्ध हलशी गावात महालक्ष्मी यात्रा महोत्सवाचा मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *