खानापूर (प्रतिनिधी) : घोटगाळीत (ता. खानापूर) येथे काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्यावतीने खास १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन मोफत तसेच ओपन गटासाठी ग्रुप डान्स, सोलो डान्स, करीओके गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस नेते इरफान तालिकोटी माहिती दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर तालुक्यातील अनेक युवकाकडे गुप्तकला गुण आहेत. मात्र त्याच्या कलागुणाना वाव मिळाला नाही. यासाठी युवकांना आपल्या कला गुणाचे प्रदर्शन व्हावे. म्हणून इरफान तालिकोटी आवार्डचेआयोजन केले.
तेव्हा येत्या १०फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता येथील केएसआरपी रोडवरील नगरपंचायतीच्या समुदाय भवनात स्पर्धकांना निवड चाचणीसाठी (Audition) साठी बोलविण्यात आले आहे.
विजेत्या स्पर्धकांना ग्रुप डान्ससाठी अनुक्रमे १५,००० रूपये, १०,००० रूपये, ५००० रूपये व सोलो डान्ससाठी अनुक्रमे ५००० रूपये, ३००० रूपये, २००० रूपये तसेच करीओके गायन (karaoke Singing) साठी अनुक्रमे ५००० रूपये, ३००० रूपये, २००० रूपये, अशी बक्षिसे देण्यात येणार आहे.
या स्पर्धा ओपन गटासाठी असुन मोफत स्पर्धा भरविण्यात येणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांनी निवासस्थानी बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
Check Also
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा युवा आघाडी मेळाव्याला जाहीर पाठिंबा
Spread the love खानापूर : युवा दिनी आयोजित युवा मेळाव्याला खानापूर तालुका म. ए. समितीने …