राज्याचा सर्वांगीण विकास केवळ भाजपच करेल; प्रमोद सावंत
मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही; प्रमोद सावंत
डिचोली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी साखळी येथे दिलेल्या भेटीचा भाजपच्या मतांवर परिणाम होणार नाही. मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळी शहरातील रोड शो दरम्यान एका सभेत सांगितले.
राज्याचा सर्वांगीण विकास केवळ भाजपच करू शकतो, हे लक्षात आल्यानंतर अधिकाधिक लोक भाजपमध्ये येऊ लागले आहेत. 2012 च्या निवडणुकीच्या वेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील साखळी भेट दिली होती, परंतु भाजपच्या मतांवर परिणाम झाला नाही, उलट भाजपने मोठ्या फरकाने जागा जिंकली. यावेळी संपूर्ण सिद्धिविनायक मंदिर समितीने भाजपमध्ये प्रवेश केला.