Sunday , September 20 2026
Breaking News

‘महात्मा बसवेश्वर’ संस्थेला १०.६९ कोटींचा निव्वळ नफा

Spread the love

 

संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुरबेट्टी; ६७५ कोटींच्या ठेवी

निपाणी (वार्ता) : प्रामाणिक संचालक मंडळ आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांमुळे महात्मा बसवेश्वर संस्थेच्या ठेवी ६७५ कोटीवर गेल्या आहेत. मार्च अखेर ९५.१८ टक्के वसुली करून संस्थेला १० कोटी ६९ लाखाचा नफा झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी दिली. रविवारी आयोजित संस्थेच्या कार्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
डॉ. कुरबेट्टी म्हणाले, संस्थेचे २७ हजार ८९ सभासद, १ कोटी ५४ लाख ४४ हजारावर भागभांडवल,८६ कोटींचा राखीव निधी, ६७५ कोटी रुपयांच्या ठेवी, ९९४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप तर २६६ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. संस्थेचे ४६५८ कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे. संस्थेच्या ३५ शाखा कार्यरत असून नवीन ६ शाखांना परवानगी मिळाली आहे. याशिवाय स्वमालकीची ७ कार्यालये आहेत
सांस्कृतिक केंद्र उभारणीचे काम सुरू असून मुलांच्या संस्कारासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन तांत्रिक ज्ञान रुजवले जात आहे. आरोग्य विमा योजनेअंतर्गत सभासद व कर्मचाऱ्यांना ३.५० कोटीची रक्कम दिली आहे. सामाजिक कार्यासाठी २ कोटीची मदत केली आहे. लवकरच संस्थेतर्फे शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश करण्यात येणार असल्याचे डॉ. कुरबेट्टी यांनी सांगितले.
संचालक श्रीकांत परमणे यांनी कोर बँकिंग, विमा सेवा, शाखाविस्तार, ऑडिट वर्ग, कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, कार्ययोजनांची माहिती दिली. सीईओ एस. के. आदन्नावर यांनी अहवाल ‌वाचन केले.
बैठकीस अध्यक्ष किशोर बाली, संचालक सुरेश शेट्टी, प्रताप पट्टणशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील,सदानंद दुमाले, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, डॉ. एस. आर. पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी,, सुवर्णा पट्टणशेट्टी, भद्रेश फुटाणे यांच्यासह संचालक सभासद व कर्मचारी उपस्थित होते. सुरज घोडके यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप गायकवाड यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *