Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे शिव- बसव जयंती निमित्त मिरवणूक

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बस स्थानकाजवळील निपाणी शहर रिक्षा असोसिएशनतर्फे शिव- बसव जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शिव बसव प्रतिमेची शहरातील विविध मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.
प्रारंभी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रोहन साळवे, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, विजय पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून घोषणा देण्यात आल्या. मिरवणुकीचे उद्घाटन झाल्यावर चिक्कोडी रोड, बसव सर्कल, कोठीवाले कॉर्नर, अशोक नगर, नरवीर तानाजी चौक, चाटे मार्केट, बेळगाव नाका, जुना पी . बी. रोड साखरवाडी मार्गे पुन्हा बस स्थानकाजवळ मिरवणूक आली.
यावेळी अस्लम शिकलगार, संदीप चावरेकर, मंडळाचे अध्यक्ष सुंदर खराडे, उपाध्यक्ष कालगोंडा शिरहटृटी, सेक्रेटरी आशुतोष कळंत्रे, खजिनदार किशोर जाधव, संजय तिप्पे, मल्लाप्पा तमनावर, पी. टी. साळुंखे, बाळासाहेब पाटील, संजय अंबुसकर, सागर तोडकर, राजू पाटील, अभिजीत कागीनकर, सुनील भोसले, सुरेश चौगुले यांच्यासह शिक्षा असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *