Sunday , July 26 2026
Breaking News

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती साजरी करण्यात आली. या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयराजे यांच्या हस्ते शिव पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती शिवाजी चौकात पताके लावण्यासह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी ८ वाजता शिवजन्मोत्सव, अभिषेक व पूजा, जिजाऊ महिला मंडळातर्फे पाळणा पूजन, शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची आता शिवाजी करून सुंठवडा वाटण्यात आला. यावेळी आमदार शशिकला जोल्ले, सहकाररत्न उत्तम पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, विजय पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, माजी नगरसेवक रवींद्र शिंदे, दिलीप पठाडे, राजू गुंदेशा शेरू बडेघर, आकाश माने, राजेंद्र माने, बाळासाहेब जासूद संजय माने, ओंकार शिंदे, रुपेश तोडकर, विशाल घोडके, नितीन साळुंखे, विनायक वडे सुनील शेलार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व शिवप्रेमी उपस्थित होते.
सोमवारी (ता.२०) दुपारी ३ वाजता होणाऱ्यामिरवणुकीतील सजीव देखावा स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे २५००१ रुपये, १५००१, ११००१ रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. शुक्रवारी (ता.२४ सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वरस्वामी प्रस्तुत ‘सलाम महाराष्ट्र सुवर्ण संस्कृतीचा’ हा लोकोत्सव कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता.२६) सांयकाळी ७ वाजता प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे संभाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *