Sunday , September 20 2026
Breaking News

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर निपाणीत कोट्यवधींची उलाढाल

Spread the love

 

सोन्याचे दर वाढूनही ग्राहकांचा खरेदीवर जोर

निपाणी (वार्ता) : वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक नागरिकांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह संसारोपयोगी साहित्याची खरेदी केली. गतवर्षीच्या दराच्या तुलनेत यावर्षी सोने-चांदीचे दर दुप्पट होऊनही खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
अक्षय तृतीया सणादिवशी नवीन दागिने आणि नवीन वस्तू घरामध्ये घेण्याकडे अनेकांचा कल दिसून आला. यंदा सोने प्रति तोळा १ लाख ४२ हजार ८०० तर चांदीचे दर प्रति किलो २ लाख ५८ हजार रुपये आहे. एप्रिल २०२६ च्या मध्यावर सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे .काही ठिकाणी मोठी घसरण तर काही ठिकाणी तेजी अनुभवायला मिळत आहे. जागतिक तणाव निवळण्याच्या संकेतांमुळे चांदी आणि सोन्याचे भावही कमी -जास्त होत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या कुवतीनुसार सोन्या, चांदीची खरेदी केल्याचे येथील सराफ व्यवसाय रवींद्र शेट्टी यांनी सांगितले.
——————————————————————-
दुचाकी, मोबाईललाही मागणी
अक्षय तृतीया दिवशी दुचाकी, मोबाईल, लॅपटॉपसह इतर सर्वच दुकानांत गर्दी दिसून आली. दूरचित्रवाणी संच, मोबाईल, फ्रीज, कुलर कंपन्यांनी सवलती, स्कीम जाहीर केल्याने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय दैनंदिन गरजेच्या वस्तूही आजच्या मुहूर्तावर खरेदीसाठी लोकांनी प्राधान्य दिल्याचे बाजारपेठेत दिसून आले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *